पुनर्वसित जोर (वाखरी) गावास उपविभागीय अधिकार्‍यांची भेट

महसूल विभागाकडून राबविण्यात येणार्‍या योजनांची दिली माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२३ | फलटण |
मौजे जोर (वाखरी) पुनर्वसित गावठाण असून या गावी १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल सप्ताह दिनानिमित्त फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी भेट दिली. यावेळी श्री जननी उपकर्ती कुंभळजाई माता व इतर देवस्थान श्री उपकर्ती जननी कुंभळजाई मूर्ती स्थापना व वृक्षरोपण सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी सचिन ढोले यांनी महसूल विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या पुरवठा, ई-पीक पाहणी, पीक विमा योजना, फळबाग लागवड कार्यक्रम, संजय गांधी निराधार अनुदान योजना, घरकुल, पीएम किसान योजना यांची विस्तृत माहिती सर्व ग्रामस्थांना दिली. तसेच यावेळी उपविभागीय अधिकार्‍यांनी सरकारी योजनांचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले.

यावेळी ढोले यांनी एक रूपयात पीक विमा या योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळालेल्या या योजनेत सर्व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे सांगून आपले पीक विमा संरक्षित करावे, असे सांगितले.

या कार्यक्रमास जोर (वाखरी) गावचे ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!