
दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । सातारा । ज्येष्ठ नागरिक संघ सातारच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केले जातात त्यातीलच एक भाग म्हणून बुधवार दि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सेवानिवृत्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त व साहित्यिक विनायकराव आगाशे यांचे मनाचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघ सातारचे कार्यवाह विजय मांडके यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक संघ सातारा च्या राजवाडा जवळील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उद्यानातील सभागृहात बुधवार दि १४ रोजी सायंकाळी चार वाजता हे व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान होईल.
व्हॅट कायद्याची ओळख , जीएसटी कायद्याची ओळख , असा आहे आयकर कायदा या पुस्तकांचे विनायकराव आगाशे हे लेखक आहेत. विविध मासिके , दिवाळी अंक यातून विनायकराव आगाशे यांनी विविध माध्यमातून लेखन केले आहे असा चौफेर लिखाण करणारा लेखक जेष्ठ नागरिक संघाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून जेष्ठांसोबत आपले विचार मांडणार आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिकांनी व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्यवाह अशोक कानेटकर व खजिनदार मदनलाल देवी यांनी केले आहे.