आळजापूरचे युवा सरपंच शुभम नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ रोजी विविध सामाजिक उपक्रम


दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | फलटण |
आळजापूर (ता. फलटण) गावचे युवा सरपंच श्री. शुभम बाळासाहेब नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांमध्ये संतकृपा फाऊंडेशन व ग्रामपंचायत आळजापूर यांच्यातर्फे गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे ‘भव्य भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातून नामवंत भजनी मंडळ दाखल होणार आहे.

तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी ‘महाआरोग्य शिबिरा’चे करण्यात आले आहे. यामध्ये फलटणचे डॉ. जे. टी. पोळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यावेळी मोफत औषधांचे वाटपदेखील होणार आहे.

या शिबिरातच मोफत ‘नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ होणार आहे.

यावेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून संतकृपा फाऊंडेशन व ब्लड बँक फलटण यांच्या वतीने ‘रक्तदान शिबिर’ आयोजित केले आहे.

त्यानंतर महिलांसाठी “हळदीकुंकू समारंभ” आयोजित करण्यात आला आहे.

या महाआरोग्य शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आळजापूरच्या उपसरपंच सौ. गीतांजली नलवडे व संतकृपा फाउंडेशनचे सचिव संदीप नलवडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!