

स्थैर्य, सातारा, दि. ८ जून : साताऱ्यातील गेंडामाळ नाका येथील श्री गणेश हाउसिंग सोसायटीत वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत बाळकृष्ण तरडे (वय ८६) यांचे आज, सोमवारी (दि. ८ जून) दुपारी एकच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आणि प्रवीण ही दोन मुले, विवाहित कन्या सौ. श्रद्धा श्रीकांत कात्रे, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत तरडे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.