
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, वडुज, दि. २४ : वडूज शहरासह वडूज गावाच्या आसपास असलेल्या पंचक्रोशी मधून वडूज गावामध्ये आठवडी बाजारा दिवशी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत असतात.
सध्या जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वडूज शहरांमधील आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती वडूजचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
