
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि.0२: सध्या राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करणे हाच उपाय सध्या समोर दिसत आहे. तरी कोळकी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर एप्रिल महिन्याच्या बुधवारी लसीकरण होणार आहे, अशी माहिती कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी दिली.
कोळकी गावामधील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी नोंदणी करून कोळकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ही या वेळी कामठे यांनी केले.
