
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : सध्या फलटण तालुक्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता चांगली वाढू लागलेली आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणारा डेरा बाजारात दाखल झालेला आहे. फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी डेरे विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षापेक्षा या वर्षी डेऱ्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत. मागील काही वर्षांमध्ये शंभर ते दीडशे रुपयांमध्ये मिळणारे डेरे आता अडीचशे रुपयांच्या घरात पोहचलेले आहेत.
