राजाळे सरपंचपदी मारुतराव मोहिते यांची बिनविरोध निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. 01 : मौजे राजाळे गावचे नूतन सरपंचपदी मारुतराव मोहितेयांची बिनविरोध निवड झाले प्रसंगी त्यांचा सत्कार करणेत आला. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व फलटणचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ.कांचनमाला संभाजीराव निंबाळकर यांचे विचाराने राजे गट पुरस्कृत जेष्ठ सदस्य मारुतराव गुलाबराव मोहिते यांची राजाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करणेत आला.

त्याप्रसंगी माजी सरपंच व विद्यमान सदस्य संभाजीबापू निंबाळकर, जयंत निंबाळकर, शशिकांत कुंभार, धनाजी जाधव, शिवाजी बुधावले, तसेच संदीप (दादा) पवार, सुरेश काकडे देशमुख, अजित निंबाळकर, अमोल भोईटे, संजय देशमुख, देवानंद शेडगे, नुरा शेख, दत्तात्रय तोरसे, अमोल मोहिते, चंद्रकांत मोहिते, किरण मोहिते, बबन सावंत, रणजित मोहिते, भैय्या शेख, विजय मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!