वारकऱ्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२३ । मुंबई । वारकऱ्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी फार मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

            परमपूज्य गगनगिरी सेवाभावी संस्थेच्या वतीने इनाम धामणी येथे बांधण्यात येणाऱ्या श्रीमती चंद्राबाई भाऊसो पाटील वारकरी भवनाचे भूमिपूजन केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विठ्ठल पाटील, माजी महापौर विवेक कांबळे व किशोर जामदार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, राजेंद्र खरात आदि मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, जाती जातीमध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे ही शिकवण अनेक संतांनी दिली आहे. जीवनामध्ये शांतता असली पाहिजे. जीवनामध्ये आपआपसामध्ये संघर्ष असता कामा नये. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने मदत देण्यासाठी प्रयत्न करू. वारकरी भवनाचे काम लवकरात लवकर पूर्ण होवोअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी स्वागत व प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी  बांधण्यात येणाऱ्या वारकरी भवनाबद्दल सविस्तर माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!