राजगड येथे महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराज यांच्या स्मृती स्मारकाच्या कामाचा श्रीमंत सत्यजितराजे व श्रीमंत विश्वजितराजे यांच्या हस्ते शुभारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | राजगड |
राजगड येथे महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराज यांचे स्मृती स्मारक उभारावे, अशी अनेक गडप्रेमींची बर्‍याच दिवसांपासून मागणी होती. या मागणीस आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. फलटणचे युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी राजगड येथे महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराज यांच्या स्मृती स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ केला.

या स्मृती स्मारकाच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी नानासाहेब धुमाळ, हेमंतराव नाईक निंबाळकर, अ‍ॅड. संग्राम कोंडे-देशमुख, प्रदीप मरळ, रवि कंक, मंगेश शिळीमकर, किशोरसिंह नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, राहुल नाईक निंबाळकर, शिबिराजे नाईक निंबाळकर, पै. गणेश निंबाळकर, वास्तू विशरद अमोल पाटणकर व समस्त नाईक निंबाळकर परिवारातील सदस्य व बारा मावळ भागातील सर्व घराण्यातील प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.

स्मृती स्मारकाच्या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे बारा मावळ भागातील मान्यवर, ग्रामस्थ व शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!