चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नदी संवाद यात्रेचे योग्य नियोजन करा – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । सातारा । चला जाणुया नदीला अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या नदी संवाद यात्रेचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने करावे, असे निर्देश   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दिले.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चला जाणुया नदीला अभियानाची बैठक संपन्न झाली . या बैठकीला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी समितीचे सदस्य व नद्याचे समन्वयक उपस्थित होते.

चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत लागणारी माहिती संबंधित विभागांनी येत्या चार दिवसात सादर करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जलसंपदा विभागांतर्गत कार्यकारी अभियंता यांनी कृष्णा, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांची माहिती तयार करुन सदस्यांकडे उपलब्ध करुन द्यावी.

नदी यात्रा शुभारंभ कार्यक्रम प्रत्येक नदीसाठी वेगवेगळा करावा.रत्र याथा 12 ते 31 डिसेंबर 2022 असे एकूण 20 दिवस काढावी. तसेच 20 गावांमध्ये नदी संवाद यात्रेचे नियोजन करण्यात यावे. संवाद यात्रेत पथनाटय, भारुड, कीर्तन यासारख्या लोक कलांच्या माध्यमातून प्रबोधनपर कार्यक्रम घ्यावेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी बैठकीत केल्या.


Back to top button
Don`t copy text!