खोटे नाव सांगून शोरूममधून दुचाकी चोरणारा गजाआड


 

स्थैर्य, खंडाळा, दि.२३: शिरवळ येथील शोरूममधून खोटे नाव सांगून नवीन मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी एका चोरट्याला नाशिक येथून शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजाभाऊ उर्फ राजू खेमू राठोड (वय 36,रा.एकंबी तांडा ,लातूर सध्या रा. हडपसर ,पुणे ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील झिशान आजरेकर यांच्या मालकीच्या दुचाकीच्या शोरूममधून बनावट नावाने राजाभाऊ राठोड याने एक लाख रुपये किमतीची एक दुचाकी विकत घेण्याचा बनाव दि 13 मार्च 2020 रोजी करीत कामगाराला दुचाकीची ट्रायल मारायची आहे असे सांगत कामगाराला खाली उतरवत दुचाकी घेऊन पलायन केले होते. दरम्यान, राजाभाऊ राठोड याच्या मुसक्या नाशिक गुन्हे शाखेने आवळल्यानंतर शिरवळ येथील घटना उघडकीस आली होती.

यावेळी शिरवळ पोलीसांनी नाशिक येथून राजाभाऊ राठोड याला अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता खंडाळा न्यायालयाने गुरुवार दि.24 डिसेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार संजय पंडित हे करीत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!