सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे बेरोजगारांसाठी ‘उंच भरारी’ योजना; नावनोंदणी सुरू


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुत उपक्रमाने शुक्रवार, दि. ६ ऑटोबर २०२३ पासून बेरोजगार तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम ‘उंच भरारी’ योजना सुरू होत आहे.

या योजनेंतर्गत

१) दुचाकी रिपेअरिंग
२) हॉटेल मॅनेजमेंट
३) असिस्टंट इलेट्रीशयन
४) चारचाकी रिपेअरिंग
५) प्लंबर
६) वेल्डींग असिस्टंट

हे कौशल्य विकासाचे कोर्सेस मोफत शिकविले जाणार आहेत. या कोर्सेसचा प्रशिक्षण कालावधी ४५ दिवसांचा असून वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष व शिक्षण किमान १० वी पास आवश्यक आहे.

हे प्रशिक्षण संपूर्ण मोफत असून निवासाची उत्तम सोय, मोफत चहा, नाष्टा व भोजन, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारास किमान ७,५०० रूपये ते १८,००० रूपयांपर्यंत नोकरी मिळण्याची संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी या रोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, दहावी पास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, चार आयकार्ड साईज फोटो (सर्व कागदपत्रांच्या तीन झेरॉस प्रती) घेऊन नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून नावनोंदणी करायची आहे.

अधिक माहितीसाठी विनोद राजे (९९२३२३१०९०), संभाजी काटकर (९५५२५९२३६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!