स्थैर्य, सातारा, दि.१४: शहरालगत असणार्या करंजे पेठेतून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, संतोष नाथा लिंबारे (वय 40, रा. वरदविनायक सोसायटी, करंजे पेठ, सातारा) यांनी त्यांची 35 हजार रुपयांची दुचाकी (एमएच 50 – एफ 2688) घराच्या समोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेली होती. मात्र, अज्ञाताने त्यांची दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार बुधवार, दि.10 रोजी रात्री अकरा ते गुरुवार, दि. 11 रोजी सकाळी आठ या वेळेत घडला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुर्यवंशी हे करत आहेत.