विनयभंगप्रकरणी चौघांवर पोस्कोचा गुन्हा महिलेसह तिघांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.१४: महिला, तिची मुलगी आणि दिरास सातारा तालुक्यातील जैतापूर गावच्या शिवारात मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला ही मजूरी करत असून  शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती स्वत:, तिची मुलगी आणि दीर असे तिघेजण एका गावच्या हद्दीत चिंचा तोडण्यासाठी गेले होते. ते चिंचा झाडत असतानाच किशोर रमेश पवार, मीनाक्षी किशोर पवार, आश्रग रंज्या पवार, अधीक्षक पितांबर शिंदे या चौघांनी फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली. दीराला हात आणि लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलीस दगडाने मारहाण केली व तिचा विनयभंग केला.या घटनेनंतर फिर्यादी महिलेने शुक्रवारी रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित चौघांच्याविरोधात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव हे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!