
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । पुणे । पुणे बंगळूर महामार्गावर सातारा शहरातील उड्डाणपुलावर दोन माल ट्रकचा अपघात झाला. अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकून पडल्याने क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
महामार्गावर सांगलीहुन पुण्याकडे जाणाऱ्या माल ट्रकच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे रस्त्याच्या मधोमध ट्रक अडकला. याचवेळी पाठीमागून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाला स्वतःचा ट्रक नियंत्रणात न आल्याने या अपघातग्रस्त ट्रक वर जाऊन आदळला. यामुळे पाठीमागील ट्रक चालक केबीनमध्ये अडकला. सातारा पोलिसांनी क्रेनच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढले. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.
