आसनगाव येथे मारहाणीत दोघे जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नागठाणे, दि. ०४ : शेतातील पाणी घरात येत असल्याने बांध मुजवण्यास सांगितल्याच्या कारणावरून आसनगाव (ता.सातारा) येथे झालेल्या भांडणात दोघे जखमी झाले आहेत.याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समाधान श्रीरंग गायकवाड (रा.आसनगाव,ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

एक महिन्यांपूर्वी समाधान गायकवाड याने त्याच्या शेतातील बांध काढल्याने शेतातील पाणी शेजारी असलेल्या चंद्रकांत मुगुटराव गायकवाड यांच्या घरात येत होते.शुक्रवारी सकाळी समाधान गायकवाड शेतात काम करत असताना चंद्रकांत गायकवाड यांच्या आजीने त्याला बांध फोडल्याने घरात पाणी येत असून बांध मुजवून टाक असे सांगिल्याने चिडलेल्या समाधानने हातातील खुरप्याने आजीच्या हातावर वार केला.ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या चांद्रकांतच्या डोक्यावरही त्याने खुरप्याने वार केला.याची फिर्याद चंद्रकांत गायकवाड यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!