
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी 11 हजार 120 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे तालुका सातारा गावच्या हद्दीत बोगदा ते शेंद्रे जाणाऱ्या रोडवर रिक्षा स्टॉप जवळील 68 ओंकार मनोहर पोतेकर राहणार शेंद्रे तालुका सातारा हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून 9 हजार 470 रुपये रोख एक मोबाईल आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, तडवळे गावच्या हद्दीत खराटे नावाच्या शिवारात मारुती चंद्रकांत साबळे, शरद आत्माराम पाटील, बाळासो गणपत पवार, सुभाष पंढरीनाथ खाडे सर्व राहणार तडवळे, तालुका खटाव हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 1650 रुपये रोख, एक मोबाईल आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.