स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मांजरा नदीकाठ वृक्ष दिंडीच्या वारकऱ्यांनी घोषणानीं दणाणून सोडला

लातूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड आता लोकचळवळ व्हावी, फक्त वृक्ष लावून नाही तर ती जगवून दाखवू या - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 25, 2022
in प्रादेशिक

दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । लातूर । वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे, हाही नागरिकांना प्रत्यय आलेला आहे, वृक्ष लागावडीसाठी प्रयत्न केल्यापेक्षा जास्तीचा नागरिकांमधून सहभाग मिळत आहे, याचं श्रेय नागरिकांचेच आहे, लोकांनी या गोष्टीला स्वीकारले आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असणार आहे असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीकाठावर दहा किलो मीटरपर्यत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून औपचारिक उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मा.आ. पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव निवृत्ती, गट शिक्षण अधिकारी संजय पंचगले, माजी सरपंच शांताबाई मुळे, उपसरपंच विकास बेद्रे, ग्रामसेवक खंडु कलबोने, तलाठी श्री. वांगवाड, केंद्र प्रमुख हुसेन शेख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोसले आदिंची उपस्थिती होती.

प्राथमिक शाळा कासारखेडा, चिकलठाणा, बामणी, प्रशाला भातांगळी, श्रीराम विद्यालय कासारखेडा, जय भवानी विद्यालय बामणी ,मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्रा. शा. खुलगापूर, मळवटी, कासारगाव, कोळपा, हनमंतवाडी, सकपाळ नगर, भातखेडा, छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी, राजमाता सुशीला देवी विद्यालय महाराणा प्रताप नगर या शाळेतील सर्व शिक्षक भातखेडा यांचा सहभाग होता.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे 0.6 टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी 33 टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत. तसे आपल्या जिल्ह्यात नागरिकांत जनजागृती आहे.

जेथे झाडे रुजवली जातात, तिथे झाडे जगवली जातात, वाढती पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी, झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत वृक्षदिंडी काढली

लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली. राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, चन्ना बसवेश्वर महाविद्यालय, कै. वेंकराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जायक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, कमाला नेहरू विद्यालय, बोरी, शिवाजी महाविद्यालय, शिवणी बु., राजर्षी शाहू विद्यालय, बोरी यांनी वृक्षलगवडीत सहभाग घेतला. ग्रीन लातूर वृक्ष टीम, आर्ट ऑफ लिव्हिंग, आधार फाऊंडेशन, लातूर वृक्ष चळवळ, आम्ही मावळे शिवबाचे, रोटरी मिडटाऊन, लातूर सायकलिस्ट क्लब, वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेवून इतरांनाही प्रेरीत केले.

सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण
11 वाजून 11 मिनिटांनी, 10 किलोमीटरची मानवी साखळी, 28 हजार वृक्षाची लागवड… या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. ते सेल्फी पॉईंट मध्ये स्वतः जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला… नंतर अनेक लोकांनी फोटो काढून घेऊन आपल्या डीपी ला लावला.

वृक्ष लागवड पुढील प्रमाणे झाली
लातूर तालुक्यातील भातखेडा येथे 2 हजार रोपे, सोनवती येथे 2 हजार रोपे, धनेगाव येथे 4 हजार रोपे, शिवणी खुर्द येथे 550 रोपे, भातांगळी येथे 3 हजार 500, भाडगाव येथे 1 हजार, रमजानपूर येथे 1 हजार 500, उमरगा येथे 2 हजार, बोकनगाव येथे 2 हजार 300, सलगरा बु. 4 हजार 100, बिंदगीहाळ 500, औसा तालुक्यातील शिवणी बु. 3 हजार, तोंडवळी येथे 2 हजार, होळी येथे 2 हजार असे गावनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिली विविध गावांना भेटी

भातगडा येथे सुरुवात करून भांतगळी फाटा, रमजानपूर, उमरगा, धनेगाव, सलगरा, बोकनगाव त्यानंतर बिंदगीहाळ या गावात जाऊन वृक्ष लागवड करून विद्यार्थी, शिक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्था, त्या त्या गावचे नागरिक यांना भेटून या अत्यंत महत्वाच्या कार्यात सहभाग घेतल्या बद्दल आणि या पुढेही हे झाडे जगवणार आहात या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत, इथून पुढेही प्रशासनाचे या कामावर लक्ष राहिल अशी भावनाही जिल्हाधिकारी यांनी गावोगावी व्यक्त केली.

Related


Previous Post

केळवली ध बधब्यात बुडालेला युवक बेपत्ताच; शनिवारी दिवसभर तपासयंत्रणा सुरु

Next Post

भादे येथील खूनप्रकरणातील संशयितास अटक; उसने पैसे मागितल्याने कुर्‍हाडीने वार करून केला होता खून

Next Post

भादे येथील खूनप्रकरणातील संशयितास अटक; उसने पैसे मागितल्याने कुर्‍हाडीने वार करून केला होता खून

ताज्या बातम्या

डॉल्बी का वाजू नये याचे उत्तर प्रशासनाने द्यावे – खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात रोखठोक पवित्रा

August 20, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

August 20, 2022

अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

August 20, 2022

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

August 20, 2022

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

August 20, 2022

प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

August 20, 2022

माजी सैनिकांसाठी काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

August 20, 2022

सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

August 20, 2022

मुख्यमंत्री प्रणित जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

August 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

August 20, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!