भादे येथील खूनप्रकरणातील संशयितास अटक; उसने पैसे मागितल्याने कुर्‍हाडीने वार करून केला होता खून

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । सातारा । भादे, ता. खंडाळा हद्दीत दगडे वस्ती येथे दि. 1 मे रोजी झालेल्या खून उसन्या पैशाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकास अटक केली आहे.

याबबात माहिती अशी, भादे, ता. खंडाळा हद्दीत दगडे वस्ती येथे उमेश पुरंदर काळे वय 25 वर्षे रा. दगडेवस्ती होडी भादे ता. खंडाळा याने उसने पैसे मागितल्याच्या कारणावरुन त्याचा दि. 1 मे रोजी गळ्यावर कुर्‍हाडीने वार करुन खुन करण्यात आला होता. त्याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करणेत आला होता. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील आरोपी गुन्हा घडले नंतर पळुन गेले होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक सातारा तसेच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी / अंमलदार आरोपी यांचा शोध घेत होते. दि. 23/07/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपी नामे महेश मुकेश भोसले हा लोणंद येथे येणार असल्याची गोपनिय माहीती बातमीदारा मार्फत मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा रचून सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व त्यास पुढील कारवाईकामी शिरवळ पोलीस ठाणेचे ताब्यात दिले.

अजय कुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा व अजित बोर्‍हाडे, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांचे सुचनेप्रमाणे, किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. रमेश गर्जे, पो. उपनि. अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, नितीन गोगावले, अमोल माने, गणेश कचरे, अमित सपकाळ, प्रविण कांबळे, मोहन पवार, प्रविण पवार, स्वप्निल दौंड, सचिन ससाणे यांनी ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!