बीयर शॉपी फोडणारे तिघे चोरटे जेरबंद सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाची कारवाई 


 

सातारा, दि.१८: कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील बियर शॉपी फोडून चोरी करणार्‍या तिन सराईत चोरट्यांना सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने जेरबंद केले आहे. अर्जुन नागराज गोसावी रा. सैदापूर, ता. सातारा, विपूल तानाजी नलवडे रा. करंजे पेठ सातारा आणि ओंकार पिलाजी पवार रा. रणदुल्लाबाद, ता. कोरगाव अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती, अशी, दि. 16 रोजी सैदापूर, ता. जि. सातारा गावच्या हद्दीमधील सातारा ते कोंडवे गावच्या हद्दीत लकी बियर शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून बियरच्या बोटल्स व चिल्लर चोरी झाली होती. याप्रकरणी राम दशरथ इंदलकर रा. कळंबे, ता. सातारा यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.  यानंतर सातारा डी. बी. पथकाने संशयितांचे वर्णन प्राप्त करून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली बियरच्या बॉटलस्, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व छोटा टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी. बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पो. ना. सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात यांनी केलेली आहे. तपास लक्ष्मण जाधव तपास करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!