
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.१९ : पाटाला पाणी द्यायचे नाही, असे म्हणत विळा हातात घेवून महिलेस दमदाटी केल्याप्रकरणी तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, संबंधित महिलेला अशोक घोरपडे, सोमनाथ अशोक धोरपडे, शैलेश अशोक घोरपडे आणि अजुबाई अशोक घोरपडे सर्व रा. पोगरवाडी, ता. सातारा संबंधित महिलेस पोगरवाडी गावच्या हद्दीतील बैदाड नावच्या शिवारात पाटातले पाणी द्यायचे नाही म्हणून शिवीगाळ केली तसेच हातात विळा घेवून धमकावले. तसेच अशोक घोरपडे याने पीडित महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार भोईटे तपास करत आहेत.
