
स्थैर्य, 29 जानेवारी, सातारा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे काल बुधवारी (दि. 28) निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल, असे राज्य शासनातर्फे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील आदेशानुसार दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ खालीलप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे. असे शासनाने निर्देशित केले आहे. दिनांक 28 ते 30 जानेवारी 2026पर्यंत सर्व शासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्या काठीवर फडकविण्यात यावा. राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल व या काळात कोणतेही अधिकृत शासकीय करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. यांचे काटकोन पालन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी करावे.

