…तर राजधानी टॉवरमधील अनियमित बांधकाम हटवले जाईल : मुख्याधिकारी संजय गायकवाड


स्थैर्य, फलटण दि. २ : फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवरमधील गाळा क्रमांक 1 व 2 च्या बांधकामाबाबत कायदेशीर / तांत्रिक बाबी तपासून सक्षम प्राधिकरण, कार्यालयाची आवश्यक ती मान्यता प्राप्त न झाल्यास व हे बांधकाम अनियमित ठरल्यास सदरचे बांधकाम नियमानुसार हटवले जाईल. यासाठी साधारणात: 20 दिवसांचा कालावधी लागणार असून त्यामुळे या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करु नये, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नगरसेवक अशोक जाधव यांना केले आहे.

राजधानी टॉवरमधील गाळा क्रमांक 1 व 2 मधील अनियमित बांधकामाविरोधात नगरसेवक अशोक जाधव यांनी कारवाई न झाल्यास सर्व विरोधी नगरसेवकांसमवेत पालिकेबाहेर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दिनांक 1 जून पासून हे आंदोलन सुरु होणार होते मात्र पालिकेने या इशार्‍याची दखल घेऊन बांधकाच्या बाबतीत कायदेशीर बाबी तपासण्याचे काम सुरु केले असल्याचे सांगून आंदोलन न करण्याची विनंती केली. त्यानुसार सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोक जाधव, सचिन अहिवळे, सचिन सूर्यवंशी बेडके, अनुप शहा, सौ.मदलसा कुंभार, सौ.मंदाकिनी नाईक निंबाळकर, सौ.मिना नेवसे, सौ.ज्योती खरात आदी विरोधी नगरसेवक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!