नाट्यगृहे म्हणजे केवळ आर्थिक कमाईच साधनं नाही, अभिनेता प्रशांत दामले यांची रोखठोक फटकेबाजी


स्थैर्य, फलटण , दि.१२: करोनाची भीती आता मागे पडत चालली असली तरी मराठी रंगभूमी ही संक्रमण काळातून जात आहे . त्याच्या उर्जितावस्थेसाठी कोणीतरी खड्डयात उडी मारायला हवी होती , ते धाडस मी केले आहे . नाट्यगृहे आणि त्यात चालणारी नाटके ही रसिकांना निखळ मनोरंजन देतात, नाटयगृहांकडे केवळ कमाईचे साधनं म्हणून पाहणे चुकीचे आहे असे रोखठोक मत नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग येत्या १९ फेबुवारी रोजी शाहू कला मंदिर येथे होत आहे . इम्तियाज पटेल यांच्या कथेवर हे नाटक आधारीत असून अद्वैत दादरकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे . प्रशांत दामले यांच्यासह कविता लाड या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत आहेत . या नाटकाच्या निमित्त दामले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला . ते पुढे म्हणाले करोनाची भीती आता हळूहळू मागे पडत असून लॉक डाऊनमध्ये अडकलेला आणि संक्रमणाशी लढणारा रसिक प्रेक्षक थिएटरकडे येऊ लागला आहे . करोनाच्या आठ महिन्याच्या संक्रमण काळात नाटय कलाकार व बॅक स्टेज आर्टिस्ट यांना प्रचंड आर्थिक ताणाला सामोरे जावे लागले . मात्र ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी मी खड्डयात उडी मारण्याची तयारी ठेऊन १२ डिसेंबरपासून एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग सुरू केले . गेल्या तीन महिन्यात या नाटकाचे तीनशे प्रयोग होऊन त्यांनी हाउसफुलची पाटी झळकविली . मुंबई वाशी ठाणे महानगरपालिकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद नाटयगृहाच्या भाड्यात कपात केली . तसेच साताऱ्यात शाहू कला मंदिराचे तेरा हजार रुपये भाडे आहे ते आम्हा रंगकर्मींना परवडणारे नाही . त्यासाठी भाडे शुल्कात कपात करण्यात यावी अशी मागणी दामले यांनी केली . नाटक हे निखळ मनोरंजन आहे . करोनाच्या संक्रमण काळात फार व्यावसायिक दृष्टीकोन दाखवणे गरजेचे नाही . मराठी नाटकांना उभारी देण्यासाठी आम्ही कलाकारांनी मानधनात पन्नास टक्के कपात केली आहे . नाटयगृहे हे कमाईचे साधन नाही तर कलाकारांच्या अविष्काराचे केंद्र आहे . महाराष्ट्रात जी बासष्ट नाट्यगृहे आहेत त्यांना एका विशिष्ट चौकटी खाली आणून या नाट्यगृहांच्या देखभालीसाठी मोठया स्वरूपात निधी उभारला जावा अशी अपेक्षा प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेनंतर प्रशांत दामले यांनी शाहू कला मंदिराला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली . यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे, नाटक संयोजक बाळासाहेब कदम माजी नगरसेवक कल्याण राक्षे यावेळी उपस्थित होते नाटयगृह भाडे कपाती संदर्भातही प्रशांत दामले यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याशी चर्चा केली.


Back to top button
Don`t copy text!