हिरामण किसनराव जाधव यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण , दि.१२: दैनिक गंधवार्ताचे कार्यकारी संपादक ॲड. रोहित अहिवळे यांचे सासरे व सह संपादिका सौ. सुरुची रोहित अहिवळे यांचे पिताश्री हिरामण किसनराव जाधव यांचे दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी आकस्मित निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, जावई,  दोन मुले, सुना, नातवंडे  असा परिवार आहे.

नाशिकरोड येथील रहिवासी असणारे हिरामण जाधव हे रेल्वे खात्यात नोकरीस होते.  त्यांचा स्वभाव हसतमुख व मनमिळावू असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.   हिरामण जाधव यांचे वडील किसनराव अर्जुनराव जाधव हे जलसाकार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम सत्याग्रहात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. हिरामण जाधव यांनी देखील लहानपणी आपल्या वडिलांबरोबर जलसा व डॉ. बाबासाहेबांच्या सभांमध्ये हजेरी लावली आहे.  अशी पार्श्वभूमी असणाऱ्या हिरामण जाधव यांचा देखील आंबेडकरी चळवळीत सहभाग होता.

दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक रोड येथे, त्यांचा जलदान व दहाव्याचा विधी संपन्न होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!