महामानवांचे कार्यच समस्त मानव जातीस प्रेरणादायक आणि दिशादर्शक आहे – प्रोफेसर विलास आढाव


स्थैर्य, पुणे, दि.२४: आपल्या भारत भूमीला तथागत बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा, महामाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, रमाई इ. महान मानवांची पार्श्वभूमी लाभल्यामुळेत्यांनी आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी इथल्या भूमीतील मानवी मनाची मशागत करून सुपीक मानवतेसाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे असे गौरौदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर विलास आढाव यांनी व्यक्त केले.
फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि आडकर फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या जयंती निम्मित मानवतावादी कार्यकर्ता गौरव पुरस्कार प्रोफेसर आढाव यांना संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी आमदार उल्हासदादा पवार, ऑड.प्रमोद आडकर आणि प्रा. विलास वाघ यांच्या हस्ते देण्यात आला.
प्रोफेसर आढाव पुढे म्हणाले की, आजच्या वैज्ञानिक युगात मानवाने कंबरेला आणि कानाला यंञे गुंडाळून सैरभैर फिरत असून मानवा- मानवापासून अनंत मैल दूर जाताना दिसून येत आहे तसेच मानवाने केलेली प्रगती केली हि प्रगती एका मानवाने दुसऱ्या मानवानशी कसे वागायचे? हे विज्ञान युगामध्ये संज्ञान झालेला मानव हा अज्ञानाचा रंगे वर्तन करून मानवी संबंधांना मात्र विसरू लागला आहे.
 तसेच नाती -गोती विसरू लागला आहे पुन्हा एकदा महामानवांच्या मानवतावादी विचारांची व्यापाक चळवळ उभी करणे गरजेचे आहे असे आव्हान सत्काराला उत्तर देताना प्रोफेसर आढाव यांनी केले.
 यावेळी उल्हासदादा पवार म्हणाले, की संतांचा वैचारिक  वारसा आपल्याला लाभला आहे परंतु आजचे हे वातावरण पाहून मन सुन्न होत चालले आहे पुंन्हा एकदा ते  वैभव प्राप्त करण्याकरिता  महामानवाच्या वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी युवा पिढी घडवली पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन कवी विठ्ठल गायकवाड यांनी केले.कार्यक्रमास डॉ. निशा भंडारे, धम्मक्रांती महोत्सव अध्यक्षा कांताताई ढोणे, धम्मसेवक एच एम शिंदे, इंद्रजित भालेराव, सम्राट अध्यक्ष दत्ता  सूर्यवंशी, सादिक शेख, करीम तुर्क, जगन्नाथ कांबळे, रवींद्र शिलवंत, अशोक प्रियदर्शी इत्यादी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!