ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, अनेक वाहनांना धडका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 23 : सातारा शहरात गोडोली ते अंजठा चौकादरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार नागरिकांनी अनुभवला. या घटनेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप वाहनचालकाने अनेक वाहनांना धडका दिल्या. या घटनेत धडक बसून दोघे दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी पिकअप वाहन चालक दिनेश लक्ष्मण केरेकर (वय 22 रा. केळवली, ता. सातारा) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारच्या सुमारास पिकअप क्रमांक (एम. एच. 11 एबी 1731) या या जीपमधील चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. गोडोली ते अजंठा चौक दरम्यान पिकअपचा वेग वाढवल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मग पिकअप जीपने समोरून येणाऱया वाहनांना धडक देत पुढे जात होती. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

या घटनेमध्ये साधारण चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या धडक बसून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दत्तात्रय पांडुरंग नाचण (वय 50, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) व निलेश रामचंद्र आवळे (वय 33, रा. गोडोली, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.                                         

…. तर मोठा अनर्थ घडला असता..ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर अत्यंत तुरळक होती. हा अपघात सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. कारण या वेळेत औद्योगिक वसाहत येथील कंपन्यामधून कामगार आपल्या वाहनांनी घरी जात असतात. त्यामध्ये महिला वर्गाचाही मोठा समावेश असतो. सायंकाळच्या वेळेस ही दुर्घटना घडली असती तर मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी घडली असती अशी भीती अनेकांनी व्यक्त केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!