बारसूमधील शेतकऱ्यांना विचारात घेऊन रिफायनरीचा प्रकल्प पुढे जाईल; एकनाथ शिंदेंची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । मुंबई । कोणताही अडथळा न येता बुधवारी बारसू येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या भू-सर्वेक्षणाचे काम सुरू होते. मंगळवारी अटक केलेल्या ११० लोकांचा जामीन बुधवारी राजापूर न्यायालयात मंजूर झाला आहे. रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे.

बारसू रिफायनरीवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.  राज्य सरकारच्या भूमिकेवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राज्यातील महत्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू रिफायनीवर प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मोठे नेते आहे. ते जे बोलतात त्याचे उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत. त्यांच्यासोबत बारसू प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. जबरदस्ती कोणताही प्रकल्प करणार नाही. बारसूमधील शेतकऱ्यांना विचारात घेऊन हा प्रकल्प पुढे जाईल. काही जणांची मान्यता आहे. तिकडचे जे भुमीपुत्र आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकांच्या मनातील संशय दूर करा 

एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? चांगले प्रकल्प असतील ते इतर राज्यात पाठवले. रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत. कोकणात आम्ही पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला मग त्यात पुढे का काही करत नाही? राज्यात उद्योगधंदे आहेत म्हणून राज्य वर आलंय. कष्टकरी, कामगार राज्यात आहेत. प्रकल्प लोकांना दाखवा, लोकांच्या मनातील संशय दूर करा. रोजगार उपलब्ध होणार असेल तर तो कायमस्वरुपी मिळणार आहे की नाही ते सांगा असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दलालांना पैसे मिळणार, सरकार दडपशाही करणार

एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादित करायची असते. तेव्हा मूळ मालक असतो त्याला किंमत द्यावी लागते. रिफायनरी आणखी कुठे लागलीय तिथे लोकांना न्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं असेल तर ते दाखवा. लोकांना चिरडून, कुणाच्यातरी सुपारी घेऊन प्रकल्प लादतायेत. मूळ मालक वेगळेच झालेत. दलालांनी जागा विकत घेतल्या. त्या लोकांना नुकसान भरपाई मिळणार. सरकार दडपशाही करणार असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.


Back to top button
Don`t copy text!