भव्य बैलगाडा शर्यंतीचे बक्षीस वितरण श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते होणार; मावळचे आ. सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ एप्रिल २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवार, दि.६ मे २०२३ रोजी भव्य ‘महाराष्ट्र केसरी फलटण बैलगाडा शर्यत २०२३’ चे कै. नंदकुमार आबाजी भोईटे मित्रमंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे. या शर्यती श्री साई मंदिरासमोर, जाधववाडी, फलटण येथे होणार आहेत. दरम्यान, या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ शनिवार, ६ मे रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ ६ मे रोजीच सायंकाळी ७.०० वाजता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपकराव चव्हाण असणार आहेत. यावेळी विशेष उपस्थिती युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, जि.प.चे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले-पाटील, माजी नगरसेवक जालिंदर जाधव, उद्योजक दिलीप जाधव, अरुण भोईटे यांची असणार आहे.

या शर्यतींचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ ६ मे रोजीच सायंकाळी ७.०० वाजता पार पडणार आहे. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शंकरराव शेळके भूषविणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या अ‍ॅड. सौ. रूपालीताई विजयसिंह ठोंबरे-पाटील, आमदार दीपकराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष उपस्थितांत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीराम कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव पवार, ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सद्गुरू हरिबुवा महाराज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, नरेंद्र भोईटे, भीमदेव बुरूंगले, सनी अहिवळे हे असणार आहेत.

या शर्यतींचा सर्व बैलगाडा प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमित भोईटे यांनी केले आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!