
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 1 : सासूबरोबर जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पवळेश्वर (लिंब) येथील एकावर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. सुरेश गणेश निकम रा. पवळेश्वर नगर (लिंब), ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी ही सासूसमवेत जळण काढण्यासाठी गेली होती. यावेळी फिर्यादीने त्याठिकाणी येवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीवरून संशयीतावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
