
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 1 : छोटा हत्ती वाहनातून बेकायदेशीररित्या प्रवासी बसवून वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिल गंगाराम जानकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, तुकाराम बाबुराव कोेकरे आणि संजय काशिनाथ कोकरे दोघे रा. पळसावडे (ता. सातारा) हे जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून छोटा हत्ती टेम्पात अंदाजे 4 ते 5 लोकांना बसवून प्रवास करत होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
