
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, सातारा, दि. 1 : येथील चाहूर फाट्यानजिक एकास पिरवाडी येथे राहायचे नाही, असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अमिना दिलावर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चाहूर फाटा येथे अमित आनंदराव उत्तेकर याने फिर्यादीच्या वडिलांना तुम्ही पिरवाडीत रहायचे नाही असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अमित उतेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.



