श्रीराम कारखान्याचा प्रलंबित निर्णय सहा आठवड्यांत घ्या; सरकारला उच्च न्यायालयाच्या सूचना

श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला निर्णय सहा आठवड्यांत घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत श्रीराम कारखान्याबाबत राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला निर्णय आजपासून सहा आठवड्यांच्या आत घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर येत आहे.

श्रीराम कारखान्याच्या निर्णयाकडे लक्ष

श्रीराम सहकारी साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात राज्य सरकारचा निर्णय प्रलंबित असल्याने याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर राज्य सरकारला सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

जवाहरकडून ८० कोटींची मागणी

दुसरीकडे, श्रीराम कारखान्याबरोबर भागीदारी असताना एकत्रितपणे व्यवसाय करत असताना प्रलंबित असलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या रकमेची जवाहर कारखान्याने मागणी चर्चा सध्या श्रीराम कारखान्याच्या वर्तुळात सुरू झाली आहे. ही रक्कम न मिळाल्यास जवाहर कारखाना प्रशासनही न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा आहे.

या दोन्ही बाबींचे अधिक तपशील समोर आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!