स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागील १० वर्षांत बजेटच्या दिवशी अशी राहिली सेन्सेक्सची कामगिरी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 31, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.३१: आधुनिक अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार हा आवश्यक घट आहे. दोलायमान भांडवल बाजाराशिवाय कोणतीही मोठी अर्थव्यवस्था कार्य करू शकत नाही. मूलभूत स्तरावर भांडवल बाजार कंपन्या आणि सरकारच्या लाँग टर्म उत्पादक वापरासाठी निधी संकलित करण्यास मदत करतात. आर्थिक विकासाची गती पाहता, भारतीय शेअर बाजाराने मागील दशकात मोठ्या प्रमाणात वृद्धी दर्शवली आहे. अर्थव्यवस्थेबाबत सरकारचा दृष्टीकोन कसा आहे, याचे संकेत बजेटच्या दिवशी बाजार कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, यावरून मिळतात. काही प्रसंगी बेंचमार्क निर्देशांक घसरले तर काही वेळा गुंतवणूकदारांनी सरकारच्या योजनांचे स्वागत केले व बेंचमार्क निर्देशांकांनी उसळी मारली. मागील दहा वर्षांमध्ये बजेटच्या दिवशी सेन्सेक्सची कामगिरी कशी होती याबद्दल तपशीलवार सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१०: तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २६ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केले. २००८ च्या जागतिक मंदीचे दुष्परिणाम कमी होत होते आणि अर्थमंत्र्यांनी लवकरात लवकर ९% वार्षिक वृद्धी दर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले. अर्थसंकल्पात महागाईवर नियंत्रण ठेवणे, ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना देणे आणि अर्थव्यवस्थेत मागणी-पुरवठ्यातील असंतुलन सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. २०१० मधील बजेटच्या दिवशी शेअर बाजाराने या घोषणांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. सेन्सेक्समध्ये १.०८ टक्क्यांनी वाढ झाली. वित्तीय तूट जीडीपीच्या ५.५ टक्के होती.

केंद्रीय अर्थसंकल्प २०११: २८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रणव मुखर्जींनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कर सवलतीची मर्यादा वैयक्तिक करदात्यांसाठी १६०,००० वरुन १८०,००० रुपयांवर करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचे पात्रता वय ६० पर्यंत कमी केले गेले व सवलत २५०००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. हा निर्णय बाजाराने उचलून धरला आणि बाजाराने त्या दिवशी ०.६९% एवढी किरकोळ वाढ दर्शवली. मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत वित्तीय तूट ४.६% वर घसरली होती. यामुळेही सकारात्मक भावनांमध्ये योगदान मिळाले.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१२: २०१२ चे प्रणव मुखर्जींनी अखेरचे बजेट सादर केले. अर्थमंत्र्यांनी वैयक्तिक करदात्यांसाठी कर सवलतीची मर्यादा वाढवली. सवलतीची मर्यादा २००,००० रुपयांपर्यंत वाढवली व प्राप्तिकराचे टप्पे अधिक तर्कसंगत करण्यात आले. भारतीय शेअर बाजाराने या घोषणांनंतर फार उत्साह दर्शवला नाही. त्या दिवशी सेन्सेक्स १.१९ टक्क्यांनी घसरला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१३: २८ फेब्रुवारी रोजी पी चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०१३ सादर केला. श्रीमंत व्यक्ती आणि कंपन्यांवरील कर या बजेटमध्ये वाढला. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवरील सरचार्ज १० टक्के प्रस्तावित केला गेला. तसेच १० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल असलेल्या कंपन्यांवरही सरचार्जही १० टक्के लावण्यात आला. परिणामी बाजाराने नकारात्मक प्रतिसाद दिला व सेन्सेक्स त्या दिवशी १.५२% नी घसरला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१४: २०१४ मध्ये नवे सरकार आले आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १० जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांनी गुंतवणूक व करकवलतीची मर्यादा वाढवली. मागील करांचे नियम कायम ठेवण्यात आले. भारतीय शेअर बाजारात या अर्थसंकल्पाच्या दिवशी किरकोळ विक्री झाली व सेन्सेक्स ०.२८% नी घसरला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१५: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सरकारने २०१५-१६ मध्ये वित्तीय तूट ३.९% पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. अर्थसंकल्पात गुंतवणुकीला चालना देण्याबरोबरच वित्तीय शिस्तीच्या बांधिलकीचा प्रयत्न केला गेला. या दिवशी बाजाराने अनुकुल प्रतिसाद दिला व सेन्सेक्स ०.४८% नी वाढला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१६: पाच वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारख्या मोठ्या घोषणांसह अर्थमंत्र्यांनी २९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी ३.५% वित्तीय तूटीचे उद्दिष्ट ठेवले. या घोषणांना बाजाराने उत्साहात प्रतिसाद दिला नाही. बजेटच्या दिवशी सेन्सेक्स ०.६६% नी घसरला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१७: २०१७ मध्ये सरकारने १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी शेतकरी, तरुण आणि वंचितांसाठी अनेक घोषणा अर्थसंकल्पात केल्या. सरकाारने वित्तीय तुटीबद्दलची वचनबद्धता दर्शवत ती ३% असल्याचे प्रस्तावित केले. या घोषणांना बाजारपेठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सेन्सेक्समध्ये त्या दिवशी १.७६% वाढ झाली. बजेटच्या दिवशी २०१० पासूनची बाजाराची ही सर्वोच्च वृद्धी ठरली.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१८: अरुण जेटलींनी २०१८ चा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये एमएसएमई, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांसाठी मोठे प्रस्ताव होते. सरकारने जीडीपीच्या तुलनेत ३.३% वित्तीय तूट दर्शवली. त्या दिवशी सेन्सेक्स काही प्रमाणात ०.१६% नी घसरला.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९: नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कार्यकारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मध्यंतरीच्या अर्थसंकल्पात केलेल्या काही प्रमुख घोषणा त्यांनी सोडल्या. त्या दिवशी ३०-शेअर सेन्सेक्स ०.९९ टक्क्यांनी घसरून बंद झाला. तत्पूर्वी अंतरिम बजेट १ फेब्रुवारी रोजी सादर झाले होते तेव्हा सेन्सेक्स ०.५९% वाढला होता.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२०: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थव्यवस्थेची गती कमी होत असल्याने बाजाराला बजेटकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यातील तरतुदींमुळे गुंतवणूदार निराश झाले. बाजाराने मोठी विक्री अनुभवली आणि त्या दिवशी सेन्सेक्स २.४३% नी घसरला. बजेटच्या दिवशी मागील ११ वर्षांमधील ही सर्वात मोठी बाजारातील घसरण ठरली.

निष्कर्ष: भारतीय शेअर बाजाराने बजेटच्या दिवशी मोठी विक्री तसेच खरेदीची क्रियाही अनुभवली आहे. बजेटच्या दिवशी बाजाराची प्रतिक्रिया ही प्रामुख्याने बजेटपूर्वीच्या अपेक्षांवर अवलंबून असते. २०२० मध्ये देशातील अर्थव्यवस्थेला साथीने ग्रासले असताना बाजाराला २०२१ मध्ये सरकारकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथील वर्ग चार कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत संचालकांना निवेदन

Next Post

64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

Next Post

64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.