लोणारी समाज एकसंघ करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे : रवींद्र धंगेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । बारामती । लोणारी समाज्यातील तरुणांनी उच्च शिक्षित होऊन उत्तम नोकरी व उत्कृष्ट व्यवसाय करावा त्याच प्रमाणे लोणारी समाज एकसंघ करण्यासाठी प्रत्यनशील राहू असे प्रतिपादन लोणारी समाज संघटना राज्य अध्यक्ष व पुणे महानगरपालिका चे मा. नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केले.

शनिवार दि 11 जून रोजी लोणारी समाज्याचा पालक-परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी रवींद्र धंगेकर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. या प्रसंगी सोमेश्वर कारखाना चे मा. उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते अखिल भारतीय लोणारी समाज संघटना सचिव रवींद्र होळकर अविनाश कर्चे,तानाजी कर्चे आप्पासाहेब कर्चे,सौ. द्वारका ताई कारंडे आदी मान्यवर उपस्तित होते.

आगामी काळामध्ये संपूर्ण राज्यभर अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे जाळ उभा करून सर्वसामान्य गोरगरीब खचलेल्या पिचलेल्या समाज बांधवांना लागेल ती मदत आपण सर्वांनी मिळून करूया दऱ्याखोऱ्या मध्ये रानावनात विखुरलेला हा समाज एकसंघ व संघटित करण्यासाठी सामूहिक प्रत्यन करू असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. अमोल कुलट:अध्यक्ष लोणारी समाज संघटना
उपाध्यक्ष किरण कारंडे, तात्यासाहेब राणे,कार्याध्यक्ष ॲड. अनिल होळकर सह- कार्याध्यक्ष- पै. गणेश दत्तात्रय आटपडकर,सचिव धनेश किसन कर्चे,प्रसिद्धी प्रमुख प्रकाश कर्चे,खजिनदार, दत्तात्रय कर्चे,सह-खजिनदार कैलास कर्चे,कायदेशीर सल्लागार –ॲड. भालचंद्र होळकर आदी पदाधिकारी यांना बारामती शहर ची कार्यकरणी जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती चे पत्र देण्यात आले
सूत्रसंचालन धनेश कर्चे व आभार प्रदर्शन अमोल कुलट यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!