दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | फलटण | तालुक्यातील ठाकुरकी व फरांदवाडी गावामध्ये पारध्यांनी धुडगुस घातला असून याबाबत ग्रामस्थ हे विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गेले असता त्यांनी तातडीने फलटणचे DYSP राहुल धस यांना बोलवत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यावेळी DYSP राहुल धस यांनी आगामी 15 दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले असल्याची माहिती फलटण बाजार समितीचे संचालक तथा युवा नेते अक्षय गायकवाड यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, युवा नेते बापूराव शिंदे यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.