दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | फलटण | शहरातील मलठण भागाचा विकास हा लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच सर्वांगीण विकास झाला असल्याचे मत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.
माजी खासदार रणजितसिंह यांच्या शुभहस्ते फलटण नगरपरिषद प्रभाग नं. 3, 4 व 5 म्हणजेच मलठण भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मलठण मधील ढोर गल्ली येथील बंदिस्त काँक्रिट गटार 34 लाख, लोहार गल्ली येथील काँक्रीटीकरन 39 लाख, गणेश नगर येथील काँक्रीटीकरन 36 लाख, संतोषी माता मंदिर रोड रस्ता डांबरीकरण 24 लाख व मलठणचे अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा व जुनी टाकी काल बाह्य झाल्या मुळे नविन 10 लाख लिटरची टाकी बांधण्याचा शुभारंभ पार पडला.