स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आयुष्यातील सर्वोच्च सन्मान – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर, चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 8, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, अमरावती, दि. ०८: श्री गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षपदी राज्याच्या महिला बालविकास मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची, तर चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची एकमताने निवड झाली.

संत गाडगेबाबा यांच्या संस्थेत काम करायला मिळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे, अशी भावना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. संत गाडगेबाबा यांची दशसूत्री, त्यांचे कार्य व विचारानुसार मिशनचे कार्य पुढे नेण्याचा संपूर्ण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः आदिवासी, भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, बालकाश्रम, वृद्धाश्रम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त, गोरक्षण इत्यादी उपक्रम राबवले जातात.

संस्थेच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी भिवाळी- वज्रेश्वरी, जि. ठाणे येथे झालेल्या श्री गाडगे महाराज मिशनच्या सर्वसाधारण सभेत या याबाबत  चर्चा होऊन सर्वांनी यशोमती ठाकूर यांची अध्यक्षपदी तर मधुसूदन मोहिते-पाटील यांची चेअरमन पदी एकमताने निवड केली.

मंत्री यशोमती ठाकूर यांचे संस्थेच्या कार्यात सदोदित सहकार्य लाभले असून संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगांव जि.अमरावती येथील समाधीस्थळ विकसित करून तिथे शासनामार्फत सोयीसुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

मोहिते -पाटील हे १९९२ पासून मिशनचे संचालक आहेत. त्यांनी गेली ९ वर्षे मिशनच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. मिशनचे माजी चेअरमन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय कीर्तनकार जिजाबा पाटील सोहोलीकर, राजारामबापू घोंगटे यांचा त्यांना वारसा लाभला आहे.

मिशनची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष-उत्तमराव देशमुख, सचिव- विश्वनाथ नाचवणे, सचिन घोंगटे. खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील. सदस्य-अश्विनभाई मेहता, मारोती शिंदे, चंद्रकांत माने, विजय औटी, सुनील बायस्कर, चंद्रकला पाचंगे हे आहेत.यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

प्लाझ्मा दान शिबिराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

कोरोना – १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

Next Post

कोरोना – १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.