शोषखड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२६ | सातारा |
शोषखड्ड्यात पडल्यामुळे चार वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लिंब (ता. सातारा) येथे घडली आहे. हर्ष स्वप्निल लोंढे (वय ४, मूळ गाव बेलावडे, ता. जावली) असे या चिमुकल्याचे नाव आहे.

हर्षचे आजोळ लिंब येथे आहे. दहा दिवसांपासून तो आजोळी होता. शुक्रवारी हर्ष आपल्या आजीबरोबर शेतातून परत येत असताना रस्त्याकडेच्या शोषखड्ड्यात पाय घसरून पडला. हा बारा फूट खोल असल्याने हर्ष याचा पाणी आणि चिखलात गुदमरून मृत्यू झाला. आर्मीत असलेले वडील शुक्रवारी हर्षला घेऊन पुण्याला जाणार होते; पण त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली.

या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार आशिष कुमठेकर करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!