
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र पोलीस दलात ८,१०० हून अधिक पदांवर भरतीची घोषणा झाली असून इच्छुक तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १६ सप्टेंबर : महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई आणि इतर विविध पदांच्या सुमारे ८,१०० जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गृह विभागाकडून या भरती संदर्भातील हालचालींना वेग आला असून, लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. पोलीस दलातील मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अर्जाची पात्रता आणि वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेसाठी किमान १२ वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच शारीरिक निकष पूर्ण करणाऱ्या तरुणांना पोलीस दलात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. वयोमर्यादा, आरक्षण आणि इतर आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत उपलब्ध करून दिली जाईल.
निवड प्रक्रिया आणि मैदानी परीक्षा
पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना पहिल्या टप्प्यात मैदानी चाचणी (फिजिकल टेस्ट) आणि त्यानंतर लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मैदानी चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाईल. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीकडे लक्ष ठेवावे आणि आपल्या तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.