स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’‘लस’ जरी आली; तरी ‘ढिलाई’ कशासाठी?

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 16, 2021
in फलटण, संपादकीय
ADVERTISEMENT

स्थैर्य, फलटण, दि.१६ : आज संपूर्ण भारतात एकाचवेळी कोवीड 19 लसीकरणाचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने….

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19  लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपर्यापर्यंत असेल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जातील. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. हा लसीकरण कार्यक्रम लसीकरण करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्यांना  या टप्प्यात ही लस मिळणार आहे. यामध्ये फलटण तालुका देखील मागे नसून सद्यस्थितीत फलटण तालुक्यासाठी 2013 लसींची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण सत्रामध्ये फलटण तालुक्यातील सर्व शासकीय आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांच्या दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांना कोवीड-19 लसीकरण दोन डोसमध्ये देण्यात येणार आहे. फलटण शहरामध्ये शंकर मार्केट परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर तालुक्यातील तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कोविड लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.

अर्थात लसीकरण मोहिमेची सुरुवात ही केवळ ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ पासून होत असली तरी निश्‍चितच ही बाब सर्वांसाठीच दिलासादायक आहे. परंतु, एकीकडे लसीकरणाची मोहिम सुरु होत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाबाधितांची संख्या अद्याप शून्यावर आलेली नसून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे, याचे भान अनेकांना नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ फलटण शहरापुरता विचार केला तर शहरात या ना त्या कामासाठी वावरणार्या 100 माणसांचे जर निरीक्षण केले तर किमान 80 लोक हे विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडलेला सर्रास दिसत आहे. मुळात कोरोनाचा प्रार्दुभाव संपलेला नाही आणि आपल्या लोकांमध्ये स्वयंशिस्त नाही हे या आधीही अनेकदा अधोरेखित झालेले असताना स्थानिक प्रशासन विना मास्क फिरणार्यांवर, सोशल डिस्टंसींगचे नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा का उचलत नाही? नियमांच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या तीन – चार महिन्यांपासून ढिलाई का दिली जात आहे? असा सवाल नियमाने वागणार्यांना पडल्यावाचून राहत नाही.

खरं तर, सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहर्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा. सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत यावी. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणार्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे, असे आदेश शासनाच्या ‘पुन्हा सुरु मोहिमे अंतर्गत’ दिनांक 31 जानेवारीपर्यंत सातारा जिल्हाधिकार्यांनी यापूर्वीच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. मात्र याकडे केवळ फलटणच नाही तर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सद्यस्थितीत दुर्लक्षच सुरु आहे आणि हे सर्वसामान्यांसाठी घातक आहे.

शेवटचा मुद्दा : भारतात दररोज आढळणार्या नवीन कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घसरणीचा कल कायम आहे. मृत्यू दरही घटत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 90% च्या पुढे आहे. याबाबी निश्‍चितच समाधानकारक आहेत. मात्र असे जरी असले तरी महाराष्ट्रात आजही रोज हजारो रुग्ण कोरोना बाधीत होत आहेत. लसीकरण जरी सुरु होत असले तरी, त्याचे निष्कर्ष समोर येईपर्यंत लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची घाई सरकार करणार नाही. लसीकरण प्रक्रिया स्थिर झाल्यावर आणि पुढे गेल्यावर हळूहळू लसीकरण स्थळांची संख्या वाढून ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे. अर्थातच याला देखील मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शासनाने घालून दिलेले नियम आजही आपल्या सगळ्यांवर बंधनकारक आहेत याचे भान सर्वांनी ठेवावे. या नियमांची अंमलबजावणी करण्यात स्थानिक प्रशासनानेही कृपा करुन कोणतीही ढिलाई दाखवू नये. ‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’ अशा अंतिम परिस्थितीतही सावधानता महत्त्वाची. इतकेच…

रोहित वाकडे,
संपादक, सा.लोकजागर, फलटण


ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Next Post

सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

Next Post

सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.