
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : पुणे येथे करोना पॉसिटीव्ह आलेल्या मुलाच्या हाय रिस्क संपर्क फलटण तालुक्यातील पाडेगाव फार्म, ता. फलटण येथे असून पाडेगाव फार्म, ता. फलटण येथील हाय रिस्क संपर्कातील ६२ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला म्हणजेच पुण्यातील करोना पॉसिटीव्ह मुलाचे आई, वडील यांचा करोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आलेला आहे. पाडेगाव फार्म, ता. फलटण येथे असणाऱ्या हाय रिस्क संपर्कातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू हॉस्पिटल मध्ये पोचण्यापूर्वीच झाला असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
पुणे येथे पॉसिटीव्ह आलेला मुलगा २९ जून ते १ जुलै पर्यंत पाडेगाव येथे राहून गेला होता. सदरच्या व्यक्तीच्या निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
