दाम्पत्यानं दोन चिमुकल्यासह संपवलं आयुष्य

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, पुणे, दि. 19 : सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. या दाम्पत्यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शहरातील एकाच कुटुंबातील चौघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील सुखसागर येथे हा प्रकार घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या करत भिंतीवर पोलिसांसाठी एक संदेश लिहिला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष) अशी सदर दाम्पत्याची नावे आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, अतुल आणि जया यांचा २०१३ साली प्रेमविवाह झाला होता. त्यांना ऋग्वेद (६ वर्ष) आणि अंतरा (३ वर्ष) अशी दोन अपत्ये होती. गुरुवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक दिवस घर बंद असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले असता भरती विद्यापीठ पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता अतुल शिंदे यांचा आयकार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजले.

यावेळी पोलिसांना गळफास घेतलेल्या खोलीतच भिंतीवर एक संदेश लिहिलेला सापडला आहे. यामध्ये ‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवत आहोत’ असे लिहिले आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे सदर दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!