‘शाळा संकुल’ संकल्पनेमुळे गुणवत्ताआणि सहकार्य वाढेल – प्राचार्य डॉ. बी. टी.जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । सातारा । ‘भौगोलिक दृष्ट्या जवळच्या शाळांनी एकत्रित येणे म्हणजे शाळा संकुल. नव्या शैक्षणिक धोरणात शाळा नुसत्या जवळ असून चालत नाहीत तर त्यांच्यात एकमेकात ज्ञानाची देवाण घेवाण करणे ,आधार देणे ,सहकार्य करणे
इथे अभिप्रेत आहे. समाजातील सर्व घटक एकत्र येऊन शाळा बलशाली करण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील अभिप्रेत आहे. शाळा संकुल झाल्यावर प्रशासन करणे सोपे जाईल.सर्व साधनांचे एकमेकास सहाय होईल. शाळा संकुलात सर्व सोयी होतील. सर्व शाळांना सर्व सुविधा वापरता येतील. शाळा संकुल सातारयात होईल तेंव्हा शाळेतले पालक देखील जोडले जातील. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता निर्माण होईल. शाळा संकुलामध्ये परस्परस सहकार्य करणे आणि गुणवत्ता वाढविणे हेच ध्येय असेल असे मत कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. बी.टी.जाधव यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत आयोजित कर्मवीर विद्या प्रबोधिनी च्या माध्यमिक विभाग शिक्षण परिषदेमध्ये
व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की ‘ शाळा संकुल संकल्पनेत एकमेकांना मदत केली पाहिजे.  मार्ग प्रक्रिया सुरू होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे ही संकल्पना अजूनही सुरू आहे.म्हणून त्या परिसरातील शैक्षणिक प्रगती बऱ्यापैकी झाली असं केंद्र सरकारला  वाटतं. यासाठी सुरुवातीला प्रयत्न करायचा लक्षात येईल. शाळा खूप चांगल्या पद्धतीने चालतील असे वाटते. जो पर्यंत आपण पालकाशी रिलेशनशिप डेव्हलप करत नाही तोवर शाळा आपल्याला सस्पेन करता येणार नाही. हुशार विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक हुशार टेक्निकल प्रापर्टी आपल्याला हवी आहे असे मत त्यांनी आपल्या सविस्तर विवेचनामध्ये केले. या सत्राचे प्रास्ताविक पश्चिम विभागाचे  सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. रत्नपारखी यांनी केले. या सत्राचे चे आभार सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. एस. टी. पवार यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!