स्थैर्य, सातारा, दि.१९: साताऱ्यातील यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले (वय 42) यांचं दुकान आहे. शुभम कदम, सचिन माळवे हे त्यांच्या दुकानात गेले आणि त्यांना अंडी उधार देण्याची मागणी केली. पण, बबन यांनी अंडी उधार देण्यास नकार दिला. बबन यांनी नकार दिल्याने हे दोघेही संतापले. त्यांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दगड आणि धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये बबन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.