बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोळकी शाखेचे काम कौतुकास्पद : हेमंत टामटा


 

     स्थैर्य, कोळकी : ग्राहक व अधिकार्यांशी चर्चा करताना कार्यकारी संचालक हेमंत टामटा, श्रीमती अर्चना जोगळेकर व मान्यवर.

स्थैर्य, कोळकी, ता.फलटण, दि.२०: येथील बँक ऑफ महाराष्ट्र कोळकी शाखेचे काम अतिशय उत्तम आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कोळकी शाखेतील ग्राहक व कर्जदार हे दोघेही शाखेच्या कामकाजाबद्दल समाधानी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र कोळकी शाखेचे काम कौतुक करण्याजोगे आहे असे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टामटा यांनी व्यक्त केले. 

बँक ऑफ महाराष्ट्र कोळकी शाखेच्या सोने तारण कर्जाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र सातारा झोनच्या झोनल मॅनेजर श्रीमती अपर्णा जोगळेकर, सातारा झोनचे उपव्यवस्थापक शशिकांत झेले, सातारा CPC चे मुख्य व्यवस्थापक सुमित बदाना, कोळकी शाखेचे शाखा व्यवस्थापक उमंग अगरवाल, उप शाखाव्यवस्थापक महेश मेंढे, कोळकी शाखेचे मुख्य कॅशिअर प्रमोद जगदाळे, कोळकी शाखेमधील प्रशांत कर्णे, राहुल कर्णे व मंगेश गिरमे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोन्याच्या वाढत्या किमतीच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांत भारतातील सोने तारण कर्ज बाजारपेठही दमदार वाढ दर्शवीत आहे. छोट्या मोठय़ा गरजा भागवण्यासाठी अल्पावधीसाठी भासणारी पैशाची गरज ही भागवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे सोने तारण कर्ज अतिशय उत्कृष्ट आहे. आजही अशा कर्जाचे प्रमाण हे गृहकर्ज आणि वैयक्तित कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे वैयक्तिक कर्जाच्या (पर्सनल लोन) तुलनेत सोने तारण कर्जाचे व्याजाचे दर खूपच कमी आहेत, असेही बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टामटा यांनी स्पष्ट केले. 

रिझव्‍‌र्ह बँकेने सोनेच्या गहाण ठेवलेलेच्या सोन्याच्या मूल्याच्या जास्तीत जास्त रकमेचे कर्ज अदा करण्याला परवानगी दिलेली आहे. काही सोने तारण कर्ज आकर्षक व्याजदराच्या पर्यायासह आणि कोणत्याही प्रक्रिया शुल्काविना, तत्पर आणि वैयक्तिककृत सेवा बहाल करून लोकांना प्रदान करतात. या कर्ज प्रकाराला वाढती मागणी पाहता, बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोळकी शाखेत सोने तारण कर्जाची सुरवात केलेली आहे. तरी पैशाची गरज असलेल्यांनी सोने तारण कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र सातारा झोनच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती अपर्णा जोगळेकर यांनी केले.

या वेळी प्रास्ताविक कोळकी शाखा व्यवस्थापक उमंग अगरवाल यांनी केले. तर आभार उपशाखाव्यवस्थापक महेश मेंढे यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!