ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; चालक ठार


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
फलटणमधील जिंती नाक्यावर असणार्‍या महादेव मंदीराजवळ फलटण – लोणंद रस्त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता ट्रकला डावीकडून ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

या अपघातात दुचाकीचालक अभिजीत महादेव करचे (वय १९, रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर हा ठार झाला, तर कृष्णा रमेश सूळ (वय १९, रा. मोरोची, ता. माळसिरस, जि. सोलापूर) हा किरकोळ जखमी झाला.

या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!