सोनगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोनगाव (ता. फलटण) येथे साजरी करण्यात आली. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पोपटराव गुलाबराव बुरुंगले यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.

शाहू महाराजांनी राजा असूनही आपल्या राज्यकारभारात शोषित, पीडित, वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, असा आग्रह धरला होता. किंबहुना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, आरक्षण, शाळा, वसतिगृहे उभारण्याला प्राधान्य दिले. भेदाभेद नष्ट व्हावा यासाठी सामाजिक सुधारणा घडवून आणली. त्यामुळेच आजचा दिवस हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवला. अशा क्रांतिकारक आणि पुरोगामी शाहू महाराजांना आज १५० व्या जयंती निमित्ताने सोनगाव, ता. फलटण येथे सर्व तरुण मंडळ सोनगाव व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

दरम्यान, सोनगाव गावच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे असे समाजगौरव, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान चेअरमन सोनगाव विविध कार्यकारी विकास सोसायटी श्री. पोपटराव गुलाबराव बुरुंगले (आबा) यांचा वाढदिवस सर्व तरुण मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पोपटराव बुरुंगले व सरपंच प्रतिनिधी रमेश जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

प्रा. राजेश निकाळजे यांनी मनोगत व सूत्रसंचालन केले. श्री. हनुमंत थोरात यांनीही मनोगतातून अभिवादन व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास दत्तात्रय ननावरे, संदीप पिंगळे, भगवान जगदाळे, गुलाबराव डोंबाळे, दिलीप भंडारे, संतोष गोरवे, लखन पिंगळे, रामहरी पिंगळे, बाबासो टेंबरे, रमेश मदने, राहुल गायकवाड, गणेश यादव, राहुल यादव, अमोल सस्ते, अतुल लोंढे, गणेश कांबळे, गणेश नामदास, सचिन शेंडे, डॉ. योगेश बुरुंगले, दादा बंडगर, सचिन शेवते, शिवाजी ढवळे, राजेंद्र आडके, ज्ञानदेव शेंडे, कानिफनाथ वाघ, बाळासो गायकवाड, राहुल यादव, सुनिल रिटे, श्रीकृष्ण रिटे, मल्हारी तोरणे, शशिकांत मोरे, सुनिल यादव, नारायण तुपे, अरविंद लवटे, बाबा लवटे, धर्मराज लांडगे, पवन भोसले, नवरंग खरात, राजेंद्र लोंढे, राजेंद्र टेंबरे, हनुमंत टेंबरे, महेश जगताप, बाजीराव निकाळजे, प्रकाश नामदास, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सर्व तरुण मंडळ सदस्य, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सर्व तरुण मंडळ, सोनगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!