
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्रात पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार महाकुंभाच्या माध्यमातून ७१ हजार हजारहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून १५८८ उद्योजक सहभागी झाले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. २२ सप्टेंबर : राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार महाकुंभाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून राज्यभरातील तरुणांसाठी तब्बल ७१ हजार ९३९ विविध पदांच्या रोजगाराच्या संधी खुल्या झाल्या आहेत. या उपक्रमात राज्यातील आणि देशातील १५८८ प्रमुख उद्योजक व कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू झाली आहे.
उद्योजक आणि बेरोजगारांसाठी मोठे व्यासपीठ
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वतीने आयोजित या महारोजगार महाकुंभाला तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत ५वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. १५८८ उद्योजकांनी एकाच छताखाली येऊन भरती प्रक्रिया सुरू केल्याने हजारो तरुणांना थेट मुलाखती देऊन रोजगाराची संधी मिळत आहे.
विविध क्षेत्रांत नोकरीची संधी
या महाकुंभात ऑटोमोबाईल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, सेवा क्षेत्र, बँकिंग आणि रिटेल अशा अनेक नामांकित क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कौशल्यानुसार नोकरी मिळवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळणार आहे.
